मुंबई, 20 डिसेंबर (प्रतिनिधी) - पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारत आणि श्रीलंका येथे फेब्रुवारी–मार्च महिन्यात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून संघात अनेक अनपेक्षित बदल करण्यात आले आहेत. शुभमन गिल याला स्पर्धेतून डच्चू देण्यात आला आहे. मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संयुक्तपणे संघाची घोषणा केली. दरम्यान, याच वेळी पुढील महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची निवड जाहीर करण्यात आली.
या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. संघात परतल्यापासून तो फलंदाजीत अपयशी ठरतो आहे. त्याच्या जागी अक्षर पटेलला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर अनपेक्षितरित्या इशान किशनला संघात स्थान मिळाले आहे. त्याला बऱ्याच काळानंतर संघात स्थान देण्यात आले आहे.
टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रिंकू सिंग, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे वेळापत्रक
7 फेब्रुवारी - विरुद्ध अमेरिका
12 फेब्रुवारी - विरुद्ध नामिबिया
15 फेब्रुवारी - विरुद्ध पाकिस्तान
18 फेब्रुवारी - विरुद्ध नेदरलँड्स
?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2002297878274818476%7Ctwgr%5Edead3685a8dec4042747808a48cb44dcaf03ee04%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2FBCCI%2Fstatus%2F2002297878274818476">
?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E2002297878274818476%7Ctwgr%5Edead3685a8dec4042747808a48cb44dcaf03ee04%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Furl%3Dhttps%3A%2F%2Ftwitter.com%2FBCCI%2Fstatus%2F2002297878274818476